Chikhali Crime News : दुचाकीचा धक्का लागल्याने तरुणावर कोयत्याने वार

0

एमपीसी न्यूज – रस्त्याने दुचाकीवरुन जात असताना एका तरुणाला दुचाकीचा धक्का लागला. त्यावरुन धक्का लागलेल्या तरुणाने आणि त्याच्या भावाने दुचाकीस्वारावर कोयत्याने वार करून जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. 10) दुपारी पाटीलनगर, चिखली येथे घडली.

सचिन नितीन गायकवाड (वय 20, रा. चिखली गावठाण) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल मोरे आणि त्याचा भाऊ (दोघे रा. पाटीलनगर, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन गायकवाड गुरुवारी दुपारी पावणे पाच वाजताच्या सुमारास त्यांच्या मित्रासोबत दुचाकीवरून पाटीलनगर चिखली येथून जात होते.

आरोपी अमोल मोरे याच्या घरासमोरून जात असताना अमोल मोरे याच्या भावाला फिर्यादी यांच्या दुचाकीचा धक्का लागला. या कारणावरून अमोल आणि त्याच्या भावाने फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला शिवीगाळ केली. त्यानंतर अमोल मोरे याने फिर्यादी यांच्या डोक्यात कोयत्याने मारून जखमी केले.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment