Chikhali crime News : उघड्या दरवाजावाटे पावणे दहा लाखांची चोरी

एमपीसी न्यूज – घराचा दरवाजा उघडा ठेऊन महिला त्यांच्या दुसऱ्या घराचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी गेल्या. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी घरातून 9 लाख 70 हजारांचे दागिने आणि रोकड चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 28) सकाळी अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शिवतेजनगर, चिखली येथे घडली.

सुमित्रा अमसिध्द खोत (वय 46, रा. शिवतेजनगर, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी अकरा वाजता फिर्यादी सुमित्रा त्यांच्या घराचा दरवाजा उघडा ठेऊन त्यांच्या दुस-या घराचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी गेल्या.

त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश केला. घरातून 165 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने आणि चार लाख रुपये रोख रक्कम असा एकूण 9 लाख 70 हजारांचा ऐवज चोरून नेला. त्यानंतर साडेअकरा वाजता हा प्रकार उघडकीस आला.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.