Chikhali Crime News : चिखलीमधून अवघ्या काही मिनिटात दुचाकी चोरीला

0

एमपीसी न्यूज – कामगाराच्या घरासमोर दुचाकी लावून कामगाराला बोलावण्यासाठी गेलेल्या तरुणाची दुचाकी अवघ्या काही मिनिटातच चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि 26) पहाटे दोन वाजताच्या सुमारास चिंचेचा मळा, चिखली येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

गणेश तानाजी हजारे (वय 27, रा. हजारेवस्ती, मोशी) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हजारे यांच्या ट्रकवर ड्रायव्हर म्हणून काम करणारा रोशन मुंडे याला बोलवण्यासाठी फिर्यादी हजारे त्यांची तीस हजार रुपये किमतीची स्प्लेंडर प्लस दुचाकी (एम एच 14 / एच एस 1485) घेऊन गेले. चिंचेचा मळा चिखली येथील जावजी बाबा हाऊसिंग सोसायटीच्या समोर फिर्यादी यांनी त्यांची दुचाकी पार्क केली. त्यानंतर कामगार रोशन याला बोलावून फिर्यादी परत आले असता त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले. हा प्रकार अवघ्या काही मिनिटांमध्ये घडला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment