Chikhali Crime News : उसने दिलेले पैसे न मिळाल्याने आर्थिक अडचणीमुळे तरुणाची आत्महत्या, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – उसने दिलेले पैसे वारंवार मागूनही परत मिळाले नाहीत. त्यातून आर्थिक अडचण आल्याने तरुणाने राहत्या घरात आत्महत्या केली. ही घटना 27 मार्च 2021 रोजी शरदनगर, चिखली येथे घडली.

अमर शंकर बनकर (वय 27) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील शंकर सदाशिव बनकर (वय 59, रा. शरदनगर, चिखली) यांनी मंगळवारी (दि. 13) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार किरण शशिकांत लोखंडे, रिबेका किरण लोखंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना त्यांच्या अडचणीच्या वेळी मयत अमर याने बरेच पैसे दिले होते. परंतु, त्यांना वेळोवेळी ते पैसे मागूनही परत दिले नाहीत. त्यामुळे अमर 15 दिवसांपासून खूप अस्वस्थ झाला होता. अमर याला पैसे परत न मिळाल्याने आर्थिक अडचण आली. त्यातूनच त्याने 27 मार्च रोजी राहत्या घरी आत्महत्या केली.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.