Chikhali Crime News : दारू प्यायला पैसे न दिल्याने ब्लेडने गाल फाडून तरुणाला लुटले

एमपीसी न्यूज – दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तिघांनी मिळून ब्लेडने तरुणाचा गाल फाडून लुटले. हा प्रकार शनिवारी (दि. 4) रात्री साने चौक, चिखली येथे घडला.

अमर मनोहर म्हेत्रे (वय 26, रा. म्हेत्रेवस्ती, चिखली) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत सोमवारी (दि. 4) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अस्लम मुजावर आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 4) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास साने चौक, चिखली येथे फोनवर बोलत थांबले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. ‘मला दारू प्यायची आहे. मला पैसे पाहिजे’ असे म्हणून फिर्यादी यांच्या गालावर ब्लेडने वार करून त्यांचा गाल फाडला. फिर्यादी यांना जबर जखमी करून ‘तू अस्लम भाईशी पंगा घेतो का’ असे म्हणत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांच्या शर्टच्या खिशातून एक हजार 800 रुपये रोख रक्कम आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.