Chikhali Crime News : पती व मुलांना ठार मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार

एमपीसीन्यूज – पती व मुलांना ठार मारण्याची धमकी देत विवाहित महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन 2016 ते 14 फेब्रुवारी 2021 या कालावधीत वेळोवेळी चिखली परिसरात घडला आहे.

याबाबत 35 वर्षीय पीडित महिलेने 23 फेब्रुवारी रोजी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका 35 वर्षीय व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या कुटुंबासोबत ओळख करून आरोपीने महिलेशी जवळीक साधली. महिलेच्या पतीला त्वचेचा त्रास असल्याने आरोपी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असत. त्यातून आरोपीने पीडित महिलेशी जवळीक वाढवली.

तसेच सन 2016 ते 14 फेब्रुवारी 2021 या कालावधीत आरोपीने पीडित महिलेच्या पती व मुलांना ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर जबरदस्तीने वारंवार बलात्कार केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.