Chikhali crime News : निवृत्त नेव्ही ऑफिसरच्या मुलीवर लग्नाच्या आमिषाने सुरक्षा दलातील इंजिनिअरकडून बलात्कार

0

एमपीसी न्यूज – निवृत्त नेव्ही ऑफिसरच्या मुलीवर सुरक्षा दलातील एका इंजिनिअरने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड येथील चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीरजकुमार भारती (रा. खडकी मिलिटरी क्वार्टर्स, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या इंजिनिअरचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार मार्च 2017 पासून 8 डिसेंबर 2020 या कालावधीत कृष्णानगर चिंचवड, सीएमई दापोडी, खडकी येथील आरोपीच्या घरी, विमाननगर आणि हिंजवडी येथील हॉटेलमध्ये घडला आहे.

आरोपी नीरजकुमार हा बॉम्बे सैपर्समध्ये गॅरीसन इंजिनिअरिंग विभागात कार्यरत आहे. तर पीडित महिलेचे वडील भारतीय नौदलात अधिकारी म्हणून कार्यरत होते. पीडितच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर सुरक्षा विभागाशी संबंधित कागपत्रांची जुळवणी करतेवेळी पीडिता आणि आरोपी यांची ओळख झाली.

आरोपीने पीडित महिलेसोबत लग्न करण्याचे आश्वासन दिले. त्यातून त्याने महिलेवर सीएमई दापोडी, खडकी येथील राहते घरी, विमाननगर, हिंजवडी येथील हॉटेलमध्ये नेऊन महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर महिलेशी लग्न न करता तिची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.