Chikhali : इंस्टाग्रामवरील टॅग काढण्यास सांगितल्यावरून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – मुलीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एका पोस्टमध्ये वर्गात शिकणा-या मुलाला टॅग केले. मुलाला हे टॅग आवडले नसल्याने त्याने मुलीला फोन करून टॅग काढण्यास सांगितले. यावरून चिडलेल्या मुलीच्या पालकांनी मुलाच्या मोठ्या भावाला बेदम मारहाण केली. यामध्ये भाऊ जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 10) रात्री नऊच्या सुमारास मोरेवस्ती चिखली येथे घडली.

मनीष महेंद्र भट्ट (वय 25, रा. साने चेंबर्स, साने कॉलनी, मोरेवस्ती, चिखली) यांनी या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार नायर, हेमंत सोनार, सुनील सोनार, ललित सोनार (सर्व रा. रामनगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ महेश भट्ट (वय 19) आणि आरोपीची मुलगी सोनिया नायर हे दोघेजण एकाच वर्गात शिकतात. सोनियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट केली. ही पोस्ट तिने महेशला टॅग केली. महेशला हे आवडले नसल्याने त्याने सोनियाला फोन करून टॅग काढण्यास सांगितले. यावरून सोनियाच्या पालकांनी आणि अन्य तीन जणांनी मिळून महेश याचा भाऊ फिर्यादी मनीष यांना मारहाण केली. फायटरने डोक्यात, डाव्या हाताला खांद्याजवळ मारल्याने मनीष यांना गंभीर दुखापत झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.