Chikhali Crime : पूर्ववैमनस्यातून घरावर दगडफेक; कोयत्याने मारून दारे-खिडक्या फोडली

एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून एका टोळक्याने एका घरावर दगडफेक केली. कोयते आणि लाडकी दांडक्याने घराच्या दरवाजावर मारले. खिडक्या फोडून नुकसान केले. हा प्रकार रविवारी (दि. 20) रात्री पावणेनऊ वाजता जयप्रकाश नारायण सोसायटी, शरदनगर, चिखली येथे घडला.

रोहिणी संजय मोरे (वय 40, रा. जयप्रकाश नारायण सोसायटी, शरदनगर, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयूर कांबळे (रा. घरकुल, चिखली), सत्यम राठोड, आदित्य शिंदे, मोन्या लुडेकर (तिघे रा. शरदनगर, चिखली), कार्तिक नायडू (रा. नेवाळेवस्ती, चिखली) आणि त्यांच्या इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा आणि आरोपी यांच्यात मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून आरोपींनी फिर्यादी यांच्या घरासमोरील रोडवर येऊन मोठमोठ्याने आरडओरडा केला. त्यानंतर फिर्यादी यांच्या घरावर दगडफेक केली. कोयते आणि लाडकी दांडके दारावर आणि खिडक्यांवर मारून नुकसान केले.

आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून त्यांच्या सास-यांच्या डोक्यात दगड मारला. फिर्यादी यांनाही त्यात मुक्कामार लागला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.