Chikhali Crime : बस प्रवासात महिलेच्या पर्समधून सव्वा दोन लाखांची चोरी

एमपीसी न्यूज : भुसावळ – चिखली बस (Chikhali Crime) प्रवासात एका महिलेच्या पर्समधून 2.16 लाख रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला. याबाबत त्या महिलेने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्या विरोधात भा. द. वि. कलम 379 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri Molestation Case : विवाहित महिलेचा विनयभंग; पती आणि दिरास जीवे मारण्याची धमकी

फिर्यादी 22 मे रोजी पहाटे 2 वाजता ते दुपारी 1.15 वाजेच्या दरम्यान भुसावळ ते चिखली असा प्रवास करून चिखली येथे मुलीच्या घरी आल्या होत्या. त्यांनी त्यांची हॅन्ड पर्स चेक केली असता पर्समध्ये ठेवलेले आहेराचे पाकीट मिळाले नाही. तेव्हा फिर्यादी यांनी खात्री केली असता, त्यांच्या पर्समधून आहेराचे पाकीट त्यामध्ये सोन्याची पोत वजन 48 ग्राम व जुनी वापरती 32 इंच पोत असे एकूण किंमत 2 लाख रुपये तसेच 16,300 रुपये असा एकूण 2,16,300 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळाला नाही. कोणीतरी अज्ञात (Chikhali Crime) इसमाने फिर्यादी यांच्या हॅन्ड पर्समधून लबाडीने फिर्यादी यांच्या नकळत चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.