Chikhali Crime : पत्नीसह कामावर निघालेल्या व्यक्तीला दगडाने मारहाण, जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – पत्नीसोबत कामावर निघालेल्या एका व्यक्तीला एकाने दगडाने मारून जखमी केले. त्यानंतर ‘आता जिवंत सोडतो, परत मला दिसला तर तुझा मर्डर करीन’ अशी धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि. 30) सकाळी दहा वाजता भीमशक्ती चिखली येथे घडली.

संपत मारुती शिंदे (वय 55, रा. भीमशक्ती नगर, चिखली) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश खोब्रागडे (रा. भीमशक्ती नगर, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी दहा वाजता फिर्यादी शिंदे आणि त्यांच्या पत्नीला कामाला जात होते. भीमशक्ती नगर येथील सिद्धीपार्क समोरील रोडवर आल्यावर आरोपी गणेश याने फिर्यादी यांना ‘काय रे बेवड्या कुठे चालला’ असे म्हणत हटकले.

यावर फिर्यादी यांनी गणेशला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र गणेशने फिर्यादी यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर रोडवर पडलेल्या सिमेंटच्या गट्टूने फिर्यादी यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. ‘आता जिवंत सोडतो, परत मला दिसला तर तुझा मर्डर करीन’ अशी धमकी दिली.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.