Chikhali Crime : घरफोडी करून टीव्ही आणि मोबईल फोन पळवला

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातून टीव्ही आणि मोबईल फोन चोरून नेला. ही घटना 23 मार्च रोजी सकाळी जाधववाडी चिखली येथे उघडकीस आली असून याबाबत 24 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय शिवाजी इंगोले (वय 40, रा. जाधववाडी, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 मार्च रात्री अकरा ते 23 मार्च सकाळी सात वाजताच्या कालावधीत फिर्यादी यांचे घर कुलूप लाऊन बंद होते. त्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून एक एलसीडी टीव्ही आणि एक मोबईल फोन असा 15 हजारांचा ऐवज चोरून नेला.

संजय यांनी सुरुवातीला याबाबत पोलिसांना माहिती दिली नव्हती. सहा महिन्यानंतर त्यांनी याबाबत गुन्हा नोंदवला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.