Chikhali : अनधिकृत घाऊक बाजारात नागरिकांची गर्दी, ‘सोशल डिस्टन्सिंग’चे तीन तेरा ; प्रशासनाचेही दुर्लक्ष

Crowds of citizens in unauthorized wholesale markets, three thirteen of ‘social distance’; The administration also neglected

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवडच्या सेक्टर 11 चिखली या रहिवासी भागात अनधिकृत घाऊक भाजी मार्केट सुरु करण्यात आले आहे. येथे खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असून ‘सोशल डिस्टन्सिंग’चे कुणीही पालन करताना दिसत नाहीत. प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळते.

परिणामी रहिवासी नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील एक आठवड्यापासून सेक्टर 11 येथिल स्टेटस चौकात दररोज पहाटे जवळपास 20 ते 40 भाजीचे टेम्पो व 100 – 200 हातगाडी भाजी विक्रेते गर्दी करत असतात.

दिवसभर सुरू असणाऱ्या व अनधिकृतपणे सुरु असलेल्या या भाजी मंडई मध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन होत नाही तसेच ‘मास्क’चा वापर करण्याकडेही दुर्लक्ष होत असल्याने दिसते.

मोशी मधील APMC मार्केटमध्ये जाण्यास प्रशासनाने अनेक बंधने घातली असल्यामुळे तिथे जाऊन भाजीपाला विक्री करण्यास शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी जवळच असलेल्या सेक्टर 11 मधील स्टेटस मिठाई चौकात भाजी विक्री सुरू केली आहे.

दिवसभर सुरू असणाऱ्या या बाजारात खरेदीसाठी झुंबड उडते तसेच खरेदीसाठी येणारे नागरिक सुरक्षेची कोणतीच काळजी घेत नसल्याने आसपासच्या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत माहिती देताना स्थानिक रहिवाशी संघटनेचे कपिल मोरे म्हणाले, पालिका प्रशासन सुद्धा या बाबतीत कानाडोळा करत असल्यामुळे येथील रहिवासी नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी केली आहे. तसेच भाजी खरेदी- विक्रीसाठी जवळच उपलब्ध असलेल्या खुल्या मैदानाचा वापर केला जावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.