Chikhali : डंपरच्या धडकेत सायकलस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगातील डंपरने धडक दिल्यामुळे सायकलस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना चिखली येथे बुधवारी सकाळी घडली.

नूरबक्षमियॉ अब्दुल गफार (वय 57, रा. सोनावणेवस्ती, चिखली) असे अपघातात ठार झालेल्या सायकलस्वाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नूरबक्षमियॉ हे बुधवारी सकाळी सव्वाआठ वाजताच्या सुमारास आपल्या सायकलवरून चालले होते. ते देहू आळंदी रोडवरील भारत वजन काट्याजवळ आले असता भरधाव वेगात आलेल्या एम एच 14 / के यू 5334 या डंपरने गफार यांना जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या गफार यांना वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.