BNR-HDR-TOP-Mobile

Chikhali: मोशी भागाला भोसरी उपविभागीय कार्यालयाशी संलग्न करण्यास विरोध

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – महावितरणकडून मोशी शाखा कार्यालयाच्या कार्यक्षेत्राला भोसरी उपविभागीय कार्यालयाशी संलग्न करण्याच्या हालचाली सुरु आहेत. सध्या मोशी शाखा कार्यालाय आकुर्डी उपविभागीय कार्यालयाला संलग्न आहे. नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने आकुर्डी उपविभागीय कार्यालय चिखली, मोरे वस्ती, साने वस्ती, म्हेत्रे वस्ती, कुदळवाडी, जाधववाडी, मोशी आदी भागांकरिता सोईस्कर आहे. त्यामुळे मोशी भागाला भोसरी उपविभागीय कार्यालयाशी संलग्न करु नये, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.

याबाबत महावितरणच्या अधिका-यांना दिलेल्या निवेदनात साने यांनी म्हटले आहे की, महावितरणकडून आपल्या शाखा कार्यालये आणि उपविभाग यांची पुनर्रचना करण्याबाबत कार्यवाही सुरु आहे. त्यानुसार सध्या असलेल्या मोशी शाखा कार्यालयाच्या कार्यक्षेत्राला भोसरी उपविभागीय कार्यालयाशी संलग्न करण्याच्या हालचाली होत आहेत. सध्या मोशी शाखा कार्यालय आकुर्डी उपविभाग, थरमॅक्स चौक या कार्यालयाशी संलग्न आहे. नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने आकुर्डी उपविभागीय कार्यालय चिखली, मोरे वस्ती, साने वस्ती, म्हेत्रे वस्ती, कुदळवाडी, जाधववाडी, मोशी आदी भागांकरिता सोईस्कर आहे.

त्यामुळे मोशी परिसराला भोसरी उपविभागीय कार्यालयाला जोडण्याचे औचित्य न समजण्यासारखे असून कुणा राजकीय व्यक्तीचे जे म्होरके महावितरणमधे बसविले आहेत. त्यांच्या सांगण्यावरून हा घाट घातला जात आहे. मोशी शाखा कार्यालयाला जर भोसरी उपविभागीय कार्यालयाशी आपण संलग्न केले. अथवा आहे, त्या परिस्थितीत काहीही बदल केला. तर आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले जाईल अशा इशारा साने यांनी दिला आहे.

HB_POST_END_FTR-A2

.