Chikhali : बालदिनानिमित्त दंत आरोग्य तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय बालदिनानिमित्त इंडियन डेंटल असोसिएशन पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने चिखली येथील गणेश इंटरनॅशनल स्कुलमध्ये दंत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना दंत आरोग्य, मुख स्वच्छता
राखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या आरोग्य तपासणी शिबिरात विधार्थी, पालक आणि शाळेचा कर्मचा-यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये डॉ. संयुक्ता खैरनार(रॉय), डॉ. संतोष पिंगळे, डॉ. श्रीकांत राव, डॉ. राम पाटील, डॉ. सुजाता पिंगळे, डॉ. राजश्री पाटील, डॉ. प्रशांत, डॉ. शंतनू रत्नपारखी यांनी तपासणी केली. या शिबिराच्या आयोजनात गणेश इंटरनॅशनल स्कुलचे व्यवस्थापक डॉ. सतीश बाबा गुळवणी व मुख्याध्यापक डॉ. रितू गुळवणी यांनी सहभाग घेतला. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. यशवंत इंगळे, सचिव डॉ. संदीप भिरुड, खजिनदार डॉ. सुमंत गरुड, डॉ. मनीषा गरुड, डॉ. अतुल पाटील यांनी मार्गदर्शन केले.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी आयडीए पिंपरी-चिंचवड अध्यक्ष डॉ. यशवंत इंगळे, सचिव डॉ. संदीप भिरुड, खजिनदार डॉ. सुमंत गरुड, सामुदायिक आरोग्य प्रशिक्षण प्रमुख डॉ. अभयचंद्र दादेवार, डॉ. मनीषा गरुड, डॉ. संयुक्त खैरनार (रॉय) आणि डॉ. प्रीती राजगुरू यांचे सहकार्य लाभले.

तसेच 14 नोव्हेंबर हा दिवस ‘जागतिक मधुमेह दिन’ साजरा केला जातो. त्यानिमित्त इंडियन डेंटल असोसिएशनच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने
यशंवतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात ‘मधमेह आणि मुख आरोग्य’ या विषयांवर डॉ. वसुंधरा रिकामे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी वायसीएममधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स, इंटर्न डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.