BNR-HDR-TOP-Mobile

Chikhali : कार्यालय तोडफोडप्रकरण; पार्थ पवार यांची दत्ता साने यांच्या कार्यालयास भेट

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे चिखलीमधील साने चौक येथे जनसंपर्क कार्यालय आहे. शुक्रवारी (दि. 7) दुपारी सात जणांच्या टोळक्याने त्यांच्या कार्यालयावर सशस्त्र हल्ला केला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते पार्थ पवार यांनी दत्ता साने यांच्या कार्यालयास भेट देत पाहणी केली.

यावेळी पार्थ पवार यांच्यासोबत शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, प्रशांत शितोळे, महिला अध्यक्ष वैशाली काळभोर आदी उपस्थित होते.

  • याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी सहा जणांच्या टोळक्याने दत्ता साने यांच्या चिखली येथील कार्यालयात तोडफोड केली. याप्रकरणी पूनम महाडिक यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी याप्रकरणातील तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी हा प्रकार कोणत्याही राजकीय षडयंत्रातून केला नसून प्रेमप्रकरणातून केला असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

आरोपींच्या मित्राच्या बहिणीचे आणि दत्ता साने यांच्यासोबत असणाऱ्या एका तरुणाचे प्रेमसंबंध आहेत. मात्र, आरोपींच्या मित्राला हे संबंध मान्य नसल्याने त्यांनी हा हल्ला घडवून आणला.

  • या धक्कादायक कबुलीमुळे या प्रकरणाला वेगेळे वळण लागले आहे. तरी देखील आरोपींच्या कबुलीवर पूर्ण विश्वास न ठेवता पोलीस इतर शक्यताही पडताळून पाहत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.