Chikhali : मशरुमचा व्यवसाय करण्यासाठी विवाहितेकडे पाच लाखांची मागणी

एमपीसी न्यूज – मशरुमचा व्यवसाय करण्यासाठी विवाहितेकडे माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. त्यासाठी विवाहितेने नकार दिला असता सासरच्या लोकांनी तिचा छळ केला. हा प्रकार साने चौक चिखली येथे घडली. याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती जयेश बाळकृष्ण फडतरे, सासू निर्मला बाळकृष्ण फडतरे, सासरे बाळकृष्ण फडतरे, सदाशिव शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 26 वर्षाच्या महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मशरुमचा व्यावसाय करण्यासाठी विवाहितेकडे माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. यासाठी विवाहितेने नकार दिला असता, सासरच्या मंडळींनी किरकोळ कारणावरुन अपमान करुन मारहाण केली. वारंवार विवाहितेला शारिरीक व मानसिक ञास दिला. पती शारिरीक संबंध ठेवण्यासाठी सक्षम नसताना देखील सासरच्या लोकांनी बळजबरीने फिर्यादी यांच्याशी विवाह लावला असल्याचा आरोप देखील फिर्यादीत करण्यात आला आहे. चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ओमासे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.