Chikhali : बहिणीच्या लग्नात झालेले कर्ज फेडण्यासाठी पत्नीकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी

पती आणि सास-याविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – बहिणीच्या लग्नात झालेले कर्ज फेडण्यासाठी पतीने पत्नीकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. तसेच त्यासाठी पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. याबाबत पत्नीने पती आणि सास-यांविरोधात गुन्हा दाखल केला. हा प्रकार ऑगस्ट 2008 ते मार्च 2019 यादरम्यान चिखली येथे घडला.

मिनीनाथ बबन डोरले, बबन श्रीपती डोरले (दोघे रा. म्हेत्रेवस्ती, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्या पिता-पुत्रांची नावे आहेत. याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि मिनीनाथ यांचे 2008 साली लग्न झाले. त्यानंतर मिनीनाथ याने पीडित महिलेला विनाकारण मारहाण केली. दरम्यान मिनीनाथ याच्या बहिणीचे लग्न झाले. या लग्नामध्ये मिनीनाथ याने कर्ज घेतले. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने पीडित महिलेकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. तसेच त्याला चारचाकी गाडी घ्यायची होती. त्यासाठी देखील पीडित महिलेला माहेरहून पैसे आणण्यास सांगितले. महिलेच्या वडिलांनी लग्नात दिलेले स्त्रीधन आरोपींनी मोडले. तसेच बबन यांनी देखील किरकोळ कारणावरून पीडित महिलेला शिवीगाळ करून घरातून हाकलून दिले. याबाबत पीडित महिलेने चिखली पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.