BNR-HDR-TOP-Mobile

Chikhali : घरगुती कारणावरून पत्नीवर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज – घरगुती कारणावरून पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार केले. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना बुधवारी (दि. 20) दुपारी पावणेतीनच्या सुमारास मोरेवस्ती चिखली येथे घडली.

जयश्री सुरेश गोसावी (वय 25, रा. मोरेवस्ती, चिखली) असे जखमी पत्नीचे नाव आहे त्यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार विजय पुंडलिक गोसावी (वय 28, रा. मतराला, ता. पानसेलम बडवाणे, मध्यप्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चिखली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी महिला जयश्री आणि विजय हे पतीपत्नी आहेत. त्यांच्यात घरगुती कारणावरून वेळोवेळी वाद व्हायचे. बुधवारी पुन्हा त्यांच्यामध्ये घरगुती कारणावरून वाद झाला. या वादातून विजय याने जयश्री यांच्या गळ्यावर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जयश्री गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चिखली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3