BNR-HDR-TOP-Mobile

Chikhali : पती आणि सास-याकडून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – पती आणि सास-याने विवाहितेचा छळ केला. तसेच तिला संगनमत करुन माहेरी पाठवले व नोटिस पाठवून घटस्फोटाची मागणी केली. ही घटना चिखली येथे 20 मे ते 16 सप्टेबर 2018 या कालीवधीत घडली.

याप्रकरणी 36 वर्षीय विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, 40 वर्षीय पती आणि 65 वर्षीय सासऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सासरी नांदत असताना आरोपींनी आपसांत संगनमत करून माहेराहून पैसे आणावेत या कारणासाठी शाररिक व मानसिक छळ करण्यात आला. तसेच फिर्यादी यांचे पती कामावर गेल्यानंतर घरात असलेले सासरे कशाचा तरी बहाणा करून फिर्यादी यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करीत असत. ही बाब फिर्यादी महिलेने पतीला सांगितली. त्यावर ‘तुझ्याशी लग्न हे माझ्यासाठी केलेले नसून वडिलांसाठी केले आहे. तू त्यांच्या इच्छेप्रमाणे राहत जा’, असा अजब सल्ला पतीने दिला.

दोघा आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांच्याशी भांडण केले. तसेच त्यांना माहेरी पाठवून घटस्फोटाची मागणी करणारी नोटीस पाठविली. ही घटना 20 मे 2018 ते 16 सप्टेंबर 2018 या कालावधीत चिखलीतील सानेवाडी परिसरात घडली.महिलेने याप्रकरणी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3