BNR-HDR-TOP-Mobile

Chikhali : लोकांची देणी देण्यासाठी विवाहितेकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी

178
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – लोकांचे घेतलेले पैसे देण्यासाठी सासरच्या मंडळींनी विवाहितेकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. विवाहितेने माहेरहून एक लाख रुपये आणले मात्र तरीही सासरच्यांनी भूक भागत नसल्याने तिच्याकडे पैसे आणण्याचा तगादा लावत तिचा छळ केला.

याप्रकरणी 23 वर्षीय विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती शरद शांताराम घोलप (रा. राजे शिवाजी नगर, प्राधिकरण, चिखली), दोन नंदा आणि दीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्या लोकांनी घेतलेले पैसे देण्यासाठी विवाहितेकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. त्यानुसार विवाहितेने माहेरहून एक लाख रुपये आणून दिले. मात्र तरीही आरोपींची भूक भागली नाही. त्यांनी आणखी पैसे आणण्याची मागणी केली. पैसे आणले नाही तर घराबाहेर काढण्याची धमकी देत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. यावरून विवाहितेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.