Chikhali : लग्नासाठी ड्रायवर कार घेऊन गेला अन तिकडेच गायब झाला

एमपीसी न्यूज – ड्रायवरचे लग्न असल्याने त्याने मालकाला लग्नाची धावपळ करण्यासाठी कार मागितली. लग्न झाल्यानंतर लगेच दुस-या दिवशी कार आणून देतो असे म्हणाला आणि दोन महिने झाले तरी कार द्यायला आलाच नाही. त्याच्याशी कसलाही संपर्क होत नसल्याने कारच्या मालकाने ड्रायवरविरोधात गुन्हा नोंदवला. ही घटना मोरेवस्ती चिखली येथे घडली.

याप्रकरणी रायबा शंकर मोरे (वय 51, रा. नामदेव हाऊसिंग सोसायटी, मोरेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार श्रीराम ऊर्फ संदीप गुरुनाथ कांगणे (वय 25, रा. नामदेव हाऊसिंग सोसायटी, मोरेवस्ती, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायबा यांच्याकडे इटिओस कार (एमएच 11/बीडी 9380) आहे. त्या कारवर आरोपी संदीप चालक म्हणून काम करतो. डिसेंबर महिन्यात त्याचे लग्न होते. त्यामुळे लग्नाची धावपळ करण्यासाठी त्याने रायबा यांच्याकडे कार मागितली.

लग्न झाले की दुस-या दिवशी कार आणून देतो, असेही संदीप याने रायबा यांना सांगितले. 22 डिसेंबर 2018 रोजी संदीप कार घेऊन गेला. तो दोन महिने उलटले तरी परत आला नाही. याबाबत गुन्हा दाखल केला असून चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.