Chikhali : चेंबरच्या अर्धवट कामामुळे रस्त्यावर पडलेल्या खडीवरून घसरून शिक्षक जखमी

एमपीसी न्यूज – चेंबरचे काम अर्धवट केले. कामासाठी लागणारी खडी रस्त्यावर पसरली. यामुळे रस्त्यावर पसरलेल्या खडीवरून घसरून एक शिक्षक जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 23) सायंकाळी सहाच्या सुमारास चिखली येथील कस्तुरी मार्केटजवळ घडली.

जखमी शिक्षक संदीप सकपाळ यांनी याबाबत माहिती दिली. निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात ‘आरोग्यमित्र’च्या प्रशिक्षण शिबिरासाठी त्यांच्या मोपेड दुचाकीवरून जात होते. ते कस्तुरी मार्केटकडून निगडीच्या दिशेने जात असताना रस्त्यावर पसरलेल्या खडीवरून त्यांची दुचाकी घसरली. यामध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

या रस्त्यावर असलेल्या उघड्या चेंबरबाबत संदीप यांनी स्थानिक नगरसेवकांकडे तक्रार करून चेंबरच्या दुरुस्तीची मागणी केली होती. एका नगरसेवकाने हद्द नसताना देखील सामाजिक भान जपत त्या चेंबरचे काम सुरु केले. मात्र, दुरुस्त करणा-या संबंधितांनी चेंबरचे काम व्यवस्थित केले नाही. त्यामुळे या कामाचा राडारोडा रस्त्यावर पसरला आहे. तसेच चेंबरच्या आजूबाजूला खड्डे पडले आहेत. रस्त्यावर मोठ्या आकाराची खडी पसरली असल्याने या खडीवरून घसरून सकपाळ पडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.