Chikhali : साने चौकातून डंपर चोरीला; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या बाजूला लॉक करून पार्क केलेला डंपर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना साने चौक, चिखली येथे घडली.

चंद्रकांत भीमशा जमादार (वय 35, रा. चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 डिसेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास फिर्यादी जमादार यांनी त्यांचा दीड लाख रुपये किमतीचा एमएच 11 / एएल 1089 हा डंपर साने चौक येथे रस्त्याच्या बाजूला लॉक करून पार्क केला.

रात्री अज्ञात चोरट्यांनी डंपर चोरून नेला. हा प्रकार 19 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी 16 जानेवारी रोजी फिर्यादी देण्यात आली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2
You might also like