BNR-HDR-TOP-Mobile

Chikhali : मोकळ्या कंटेनरला आग

एमपीसी न्यूज – थांबलेल्या मोकळ्या कंटेनरला आग लागली. यामध्ये कंटेनर जळून खाक झाला. ही घटना आज (बुधवारी) दुपारी बाराच्या सुमारास जय गणेश खडी मशीन रोडवर घडली.

अग्निशमन विभागाचे दिलेल्या माहितीनुसार, चिखली येथील जय गणेश खडीमशीन रोडवर मोकळा कंटेनर (एन एल 01 / क्यू 8992) थांबला होता दुपारी बाराच्या सुमारास कंटेनरच्या केबिनमध्ये अचानक आग लागली. काही क्षणात आग पसरली. कंटेनरच्या केबिनने पूर्णतः पेट घेतला. आगीची घटना घडताच कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच चिखली अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. फायरमन अवधूत आल्हाट, सुशीलकुमार राणे, अशोक पिंपरे, नितीन पोखरे यांनी काही क्षणात आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण समजून शकले नाही. कंटेनरच्या मालकाला घटनेची माहिती दिली आहे. कंटेनरची केबिन पूर्णतः जळून खाक झाली आहे.

HB_POST_END_FTR-A2