_MPC_DIR_MPU_III

Chikhali: सिलिंडर स्फोटप्रकरणी निष्काळजी कंपनी मालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कंपनीतील नायट्रोजन सिलिंडरचा स्फोट होऊन कामगारांना जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंपनी मालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना चिखली – सोनवणे वस्ती येथील मोरया डाय कास्टर कंपनीमध्ये शनिवारी (दि. 22) रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली.

_MPC_DIR_MPU_IV

प्रमोद नथू थोरात (वय 46, रा. आत्ममालिक रेसिडेन्सी, इंद्रायणीनगर, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या कंपनी मालकाचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II
  • झालेल्या स्फोटात कंपनी मालक थोरात यांच्यासह त्यांचा मित्र राहुल गौड (वय 25, रा. हरगुडे वस्ती, कुदळवाडी) आणि सुपरवायझर संतोष थोरात हे जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनवणे वस्ती येथे प्रमोद थोरात यांची मोरया डाय कास्टर कंपनी आहे. कंपनीमध्ये शनिवारी सहा कामगार काम करत होते. कंपनीत डाय बनवण्याचे काम सुरू असताना कंपनीत असलेल्या नायट्रोजन सिलींडरचा स्फोट झाला. यात थोरात यांच्यासह तीनजण जखमी झाले. गौड यांचा पाय फ्रॅक्चर झाला. तर, संतोष यांच्या डोक्याला मार लागला.

  • कंपनीत डाय कास्टर मशिन चालविण्याचे अधिकृत प्रशिक्षण न देता प्रमोद यांनी मशिन चालविण्यास दिली. नायट्रोजन सिलिंडरबाबत आवश्यक खबरदारी न घेतल्याने स्फोट झाला. त्यामुळे निष्काळजीपणाबद्दल चिखली पोलिसांनी प्रमोद यांच्यावर गुन्हा दाखल केला. फौजदार मधुसूदन घुगे तपास करत आहेत.
_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.