BNR-HDR-TOP-Mobile

Chikhali: तिसरी मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ; पतीवर गुन्हा दाखल

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- लागोपाठ तीन मुली झाल्याने महिलेला बेदम मारहाण करत शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी रविवारी (दि.२४) चिखली पोलीस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी २८ वर्षीय विवाहितेने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती अनिल रामनयन भारती (जाधववाडी, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी,फिर्यादी महिला आणि आरोपी अनिल यांचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. महिलेस नुकतेच तिसरी मुलगी झाली आहे. तेव्हापासून आरोपी पती याने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरु केला. तिला टोचून बोलून तिचे भिंतीवर डोके आपटत बेदम मारहाण केली. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून महिलेनने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पतीवर गुन्हा दाखल झाला असून उपनिरीक्षक मधुसूदन घुगे याचा अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4

.