BNR-HDR-TOP-Mobile

Chikhali : तीन अल्पवयीन मुलांकडून पाच मोटारसायकल जप्त

एमपीसी न्यूज – चिखली पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 87 हजार रुपये किमतीच्या पाच मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे भोसरी पोलीस ठाण्यातील एक आणि चिखली पोलीस ठाण्यातील चार वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपूर्वी चिखली पोलीस ठाण्यात वाहनचोरीचा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना चिखली पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला मोटारसायकलसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकलबाबत चौकशी केली असता त्याने त्याच्या अन्य दोन साथीदारांसह मिळून चिखली आणि भोसरी येथे पाच दुचाकी चोरल्या आहेत.

त्यावरून त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण 87 हजार रुपये किमतीच्या पाच मोटारसायकल जप्त केल्या. या कारवाईमुळे भोसरी पोलीस ठाण्यातील एक आणि चिखली पोलीस ठाण्यातील चार वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3