Chikhali: पूर्ववैमनस्यातून तोडफोड करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल

Chikhali: Five persons charged with vandalism out of prejudice आरोपी हे फिर्यादी सविता यांच्या घरी आले. 'रोहित कुठे आहे,' असे म्हणत त्यांनी शिवीगाळ करीत घरातील साहित्याची लाकडी दांडक्‍याने तोडफोड केली.

एमपीसी न्यूज- पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून घरातील साहित्याची तोडफोड करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रुपीनगर, तळवडे येथे बुधवारी (दि. 24) दुपारी घडली.

विशाल दिलीप धोत्रे, लता विशाल धोत्रे (दोघेही रा. आंबेडकर वसाहत, ओटास्कीम, निगडी), भीमराव सिताराम पवार, भीमराव याची पत्नी तसेच दोन अनोळखी व्यक्‍ती (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी सविता विकास धोत्रे (वय 29, रा. रुपी हाऊसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विशाल धोत्रे व भीमराव पवार या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच दिवसांपूर्वी फिर्यादी सविता यांचा भाचा रोहित विजय जाधव याच्याशी आरोपींचे भांडण झाले होते.

या भांडणाचा राग मनात धरून बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आरोपी हे फिर्यादी सविता यांच्या घरी आले. ‘रोहित कुठे आहे,’ असे म्हणत त्यांनी शिवीगाळ करीत घरातील साहित्याची लाकडी दांडक्‍याने तोडफोड केली. यामध्ये 38 हजार रुपयांचे नुकसान झाले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.