Pimpri: कोरोनाबाधित माजी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचे निधन

Chikhali: Former Leader of Opposition and NCP corporator Datta Sane passed away due to Corona infection

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने (वय 47) यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज (शनिवारी) सकाळी चिंचवड येथील खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले.  साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती. 

दत्ता साने यांच्या मागे आई, पत्नी हर्षदा, 19 वर्षीय मुलगा यश, 16 वर्षीय कन्या तसेच दोन भाऊ व मोठा परिवार आहे.

 साने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक होते. चिखली परिसरातून तीनवेळा ते निवडून आले होते. लॉकडाउन कालावधीत त्यांनी नागरिकांना मोठी मदत केली. अन्नधान्यांचे वाटप केले होते. त्यामुळे त्यांचा नागरिकांशी संबंध आला होता. ‘दत्ताकाका’ या नावाने चिखली परिसरातच नव्हे तर संपूर्ण शहरात परिचित होते.

25 जून रोजी  त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर चिंचवड परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचे निधन झाले आहे. त्यांना कोरोनासह निमोनियाची देखील लागण झाली होती. साने यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

चिखली येथील प्रभाग क्र. एक मधून निवडून आले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत ते सलग तीन कार्यकाल ते नगरसेवक होते. विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही त्यांनी सक्षमपणे सांभाळली होती. महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय समितीचे ते माजी अध्यक्ष होते. एक झुंजार, आक्रमक व अभ्यासू कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. भोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी ते इच्छुक होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.