Chikhali : गर्भवती महिलेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – घरातील काम येत नसल्याच्या कारणावरून गर्भवती महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जून 2019 ते डिसेंबर 2019 या दरम्यान मोरेवस्ती, चिखली येथे घडला.

याप्रकरणी 21 वर्षीय विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती सुदर्शन भालेराव, दीर नागसेन भालेराव, प्रज्ञा गायकवाड, मुक्ताबाई भालेराव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सासरी नादांत असताना आरोपींनी घरातील कामे येत नसल्याच्या क्षुल्लक कारणावरून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच, आरोपी पती सुदर्शन याने ‘तुझ्या पोटातील मुल मला नको, तू ते खाली कर, संध्याकाळपर्यंत तू जर तुझ्या आईकडे गेली नाही, तर तुला उद्याचा दिवस दिसणार नाही’ असे म्हणत गर्भपात करण्यासाठी महिलेवर दबाव टाकल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.