Chikhali : टास्कच्या बहाण्याने एक लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज – टास्क देऊन ते पूर्ण केल्यानंतर पैसे मिळतील, असे आमिष (Chikhali) दाखवून एका व्यक्तीची एक लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना 11 मे रोजी दुपारी जाधववाडी, चिखली येथे घडली.

संदीप आनंदराव पाटील (वय 40, रा. जाधववाडी, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उर्बी पटेल, मोहित बिसवाल, रोषण बिंदवाल, दर्शन फूड प्रोडक्ट यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : परमवीर सिंग यांच्यामागे भाजपचाच अदृश्य हात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेलिग्रामवर फिर्यादी यांनी एका महिलेचा आयडी पाहिला. त्यात असलेल्या लिंकवर एक टास्क  (Chikhali) होता. त्यानुसार फिर्यादीने लिंकवर जाऊन हॉटेलला लाईक केले. त्यावेळी फिर्यादी यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले. आणखी काही टास्कचे फिर्यादीस दोन हजार 800 रुपये मिळाले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना टास्कद्वारे पैसे कमावण्यासाठी पैसे भरण्यास सांगितले. फिर्यादी यांनी एक लाख रुपये भरले असता आरोपींनी त्यांची फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.