Chikhali : चिखलीत गरिबांसाठी शिवजयंती उत्सव मंडळाचे मोफत अन्नछत्र

एमपीसी न्यूज – कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासठी शासनाने लॉकडाउन केले आहे. तसेच शासनाने केलेल्या संचार बंदीमुळे अनेक छोट्या कंपन्यामधील कामगार, मजूर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरजू लोकांवर उपासमारीची वेळ येऊ नये, या हेतूने टाळगाव चिखली येथील एक गाव एक शिवजयंती उत्सव मंडळाने मोफत अन्नछत्र सुरू केले आहे.

अनेक स्वयंसेवक कार्यकर्ते आणि डॉक्टरांनी दिलेल्या सुरक्षिततेच्या नियमांची या अन्नछत्रात पालन केले जात आहे. स्वयंसेवक स्वतः मास्क, हँगलोज वापर करत आहेत. तसेच एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून गरीब , गरजू लोकांच्या वस्तीवर जाऊन कार्यकर्ते अन्नदान करीत आहेत.या अन्नछत्रात दररोज हजारो लोकांसाठी भोजनाची व्यवस्था केली जाते. तसेच अन्नदान करण्याबरोबर कोरोनाबाबत जनजागृती करण्याचे काम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले.या उपक्रमामुळे हजारो गरिबांनी समाधान व्यक्त केले.

या अन्नछत्रातून पहिल्या दिवशी तीनशे तिनशे, दुसऱ्या दिवशी पाचशे आणि आज जवळपास सातशे गोरगरीब नागरिकांना मोफत अन्नदान करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.