Chikhali: नामांतराच्या विरोधात घरकुलवासियांचे महापालिकेसमोर आंदोलन

'घरकुल नवनगर संकल्प' असेच नाव देण्याची केली मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिके तर्फे उभारण्यात आलेल्या घरकुलाच्या नामांतराला विरोध करत घरकुलवासियांना आज (सोमवारी) महापालिकेसमोर आंदोलन केले. तसेच ‘घरकुल नवनगर संकल्प’ असे सर्वसमावेशक नाव देण्याची मागणी करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जेएनएनयूआरएमअंतर्गत चिखली येथे आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी गृहप्रकल्पाचे बांधले जात आहेत. 160 इमारती उभारुन सहा हजार 720 सदनिका बांधल्या जाणार आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत 124 इमारतींची उभारणी झाली असून त्यामध्ये पाच हजार 208 लाभार्थी राहत आहे. उर्वरित प्रकल्पाचे काम सुरु असून हा प्रकल्प ‘घरकुल’ या नावाने ओळखला जातो.

  • सर्वसमावेशक नाव द्या
    या प्रकल्पाचे नामांतरण करण्याचे सत्ताधारी भाजपच्या विचाराधीन आहे. घरकुल प्रकल्पाचे ‘स्वर्गीय गोपीनाथ मुंडेनगर’ करण्याचा विचार आहे. परंतु, या नामकारणाला घरकुलवासियांनी विरोध दर्शविला आहे. घरकुलवासियांना विश्वासात न घेता नामांतरणाचा घाट घातला जात आहे. ही एकधिकारशाही आहे. फेडरेशन आणि घरकुलधारकांना गोपीनाथ मुंडे यांच्याविषयी नितांत आदर आहे. परंतु, भविष्यात या नावावरुन वादविवाद, जातीपातीचे राजकारण होऊ शकते. सलोख्याचे वातावरण दुषित होऊ शकते. त्यामुळे जातीपातीशी निगडीत व्यक्तीचे नाव न देता ‘घरकुल नवनगर संकल्प’ असे सर्वसमावेशक नाव देण्यात यावे, अशी मागणी घरकुलवासियांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.