BNR-HDR-TOP-Mobile

Chikhali : कपड्यांच्या दुकानातून पिशवीतले मंगळसूत्र लंपास

एमपीसी न्यूज – दुरुस्तीसाठी नेलेले 50 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र कपडे खरेदीच्या वेळी पिशवीत ठेवले. कपडे खरेदी करत असताना अज्ञात चोरट्याने पिशवीतले मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 14) रात्री आठच्या सुमारास डायग्नोल मॉल चिखली येथे घडली.

शेखर लक्ष्मण मालकुरे (वय 48, रा. मोरे वस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर आणि त्यांच्या पत्नी बुधवारी रात्री खरेदीसाठी चिखली येथील डायग्नोल मॉल येथे गेले. दरम्यान, त्यांच्या पत्नीचे मंगळसूत्र खराब झाल्याने ते दुरुस्त करण्यासाठी त्यांनी सोबत घेतले. मंगळसूत्र गळ्यात घालता येत नसल्याने त्यांनी ते पिशवीत ठेवले. डायग्नोल मॉल येथे कपडे खरेदी करत असताना अज्ञात चोरट्याने पत्नीच्या पिशवीत ठेवलेले 50 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3