Chikhali : सव्वा दोन लाखांचा गुटखा जप्त; गुन्हे शाखेच्या युनिट एकची कारवाई

एमपीसी न्यूज – टेम्पोतून वाहतूक होत असणारा तब्बल सव्वा दोन लाखांचा गुटखा गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून पकडला. सोमवारी (दि. 12) रात्री नऊच्या सुमारास चिखली येथील आळंदी रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी टेम्पोचालक सचिन गंगाधर पाटील (वय 28 रा अयोध्यानगर, मालेगाव,जि. नाशिक) याला अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार, गुटखा वाहतूक होत असणारा एक आयशर टेम्पो देहू आळंदी रस्त्याने आळेफाटा येथे जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस कामचारी महेंद्र तातळे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून चिखली परिसरात संशयित टेम्पो अडवला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी रवी जेकटे यांना स्टाफसह बोलावून टेम्पोची तपासणी केली असता आतमध्ये 2 लाख 37 हजार 600 रुपयांचा विविध प्रकारचा गुटखा असलेली आठ पोती मिळाली. याप्रकरणी वाहनचालकाला अटक केली असून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस कर्मचारी राजू केदारी, प्रमोद वेताळ, प्रमोद लांडे, महेंद्र तातळे, अमित गायकवाड, विशाल भोईर यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.