Chikhali : सुंदर नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ; सहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दिसायला सुंदर नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना चिखली येथे घडली. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत 27 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती नरेश कानसिंग शेखावत, सासरे कानसिंग बद्रसिंग शेखावत, सासू कैवरभवर शेखावत यांच्यासह अन्य तीन अनोळखी महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 11 मे 2016 ते ऑक्‍टोबर 2019 या कालावधीत घडली. आरोपींनी आपसात संगनमत करून दिसायला सुंदर नसल्याच्या कारणाने फिर्यादी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच, तिच्याकडे माहेराहून पाच लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच जोपर्यंत पाच लाख रुपये आणत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही, असे सांगून पती निघून गेला. यामुळे फिर्यादी या आपल्या सासऱ्यांच्या घरी गेल्या.

दरम्यानच्या काळात सासऱ्याने फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून साहित्याची नासधूस केली. तसेच फिर्यादी विवाहिता यांना घरातून हाकलून दिले. पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.