Chikhali : दुकानात आलेल्या ग्राहकाकडून दुकानदार महिलेचा विनयभंग

Harassment of shopkeeper woman by a customer who came to the shop

एमपीसी न्यूज – किराणा दुकानात बॉबी घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाने शिवीगाळ आणि गैरवर्तन करत महिलेचा विनयभंग केला. तसेच तिला व तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 17) दुपारी भीमशक्ती नगर, मोरेवस्ती, चिखली येथे घडली.

दिनेश खरात (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २६ वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे किराणा दुकान असून बुधवारी दुपारी आरोपी त्यांच्या दुकानात आला. त्याने मागितल्यानुसार फिर्यादी त्याला बॉबी देत होत्या.

त्यावेळी ‘तुझा नवरा कोठे आहे, त्याला लवकर येथे बोलव’, असे म्हणून आरोपी याने महिलेला शिवीगाळ केली.

‘तू येथे कशाला आला आहेस’, असे फिर्यादी यांनी त्याला विचारले असता आरोपी महिलेच्या अंगावर धावून गेला. तसेच महिलेशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला.

‘तुला व तुझ्या नवऱ्याला जीवे मारून टाकतो, अशी धमकी देऊन फिर्यादी व त्यांच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत‌.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.