BNR-HDR-TOP-Mobile

Chikhali : लग्नात फ्रिज न दिल्यावरून विवाहितेचा छळ; 28 वर्षीय विवाहितेची चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद

एमपीसी न्यूज – लग्नात सासरच्या मंडळींनी फ्रिज दिला नाही. या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. ही घटना 19 मार्च 2012 पासून 9 सप्टेंबर 2019 या कालावधीत लातूर, पुणे आणि चिखली येथे घडली.

याप्रकरणी 28 वर्षीय विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती हरिचंद्र हणमंत सावंत, सासरे हणमंत भानुदास सावंत, दीर जगन्नाथ हणमंत सावंत, सासू सुकुमार हणमंत सावंत, जाऊ चंद्रकला जगनाथ सावंत, नणंद अलकनंदा माधव हाडोले, नंदवा माधव शिवाजी हाडोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 मार्च 2012 पासून 9 सप्टेंबर 2019 या कालावधीत आरोपींनी संगनमत करून विवाहितेच्या माहेरच्यांनी लग्नात फ्रिज दिला नाही. या कारणावरून तिचा छळ केला. तसेच या कालावधीत आरोपींनी विवाहितेच्या माहेरच्यांकडून 2 लाख 90 हजार रुपये आणि तिचे दागिने घेतले.

तसेच घरगुती आणि इतर कारणांवरून तिला शिवीगाळ, मारहाण करत धमकी देत तिचा लातूर, पुणे आणि चिखली येथे शारीरिक व मानसिक छळ केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3