Chikhali : पोहे बनविल्यावरून पत्नी आणि मुलाकडून पतीला मारहाण; पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – किचनमध्ये पती पोहे बनवत असताना बाहेरून आलेल्या पत्नीने आणि मुलाने पतीला कढई आणि बेल्टने मारहाण केली. हा प्रकार गुरुवारी (दि. 6) सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोरेवस्ती, चिखली येथे घडला.

जालिंदर लक्ष्मण सरवदे (वय 49, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रतिभा सरवदे (वय 36) आणि मुलगा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी फिर्यादी त्यांच्या घरी होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना भूक लागली म्हणून त्यांनी मुलाला पोहे आणायला सांगितले. मुलाने पोहे आणून दिले. त्यानंतर, फिर्यादी किचनमध्ये पोहे बनवत होते. त्यावेळी आरोपी पत्नी बाहेरून आली. ‘काय तमाशा लावला आहे?’ असे म्हणत ती कढई घेऊन फिर्यादी पतीच्या अंगावर धावून गेली. त्यावेळी त्यांच्या मुलीने आईला अडवले.

फिर्यादी हॉलमध्ये गेले असता तिथे आईच्या सांगण्यावरून त्यांच्या मुलाने त्यांना कमरेच्या बेल्टच्या कडीने मारले. त्यानंतर, पत्नीने देखील बेल्टने मारहाण केली. यामध्ये पतीला गंभीर दुखापत झाली. मारहाण झाल्यानंतर पत्नी आणि मुलाने फिर्यादी यांना मारून टाकण्याची धमकी दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.