Chikhali : विवाहितेच्या छळप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – विवाहितेकडे वारंवार पैशांची मागणी केली. तसेच लग्न झाल्यापासून नऊ महिने शारीरिक सुखापासून वंचित ठेवले. या प्रकरणी पतीच्या विरोधात पत्नीने चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना फेब्रुवारी ते डिसेंबर 2019 या कालावधीत घोडेगाव जवळील सुपेधर येथे घडली.

याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 33 वर्षीय तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 फेब्रुवारी 2019 रोजी फिर्यादी तरुणीचा विवाह झाला. त्यानंतर डिसेंबर 2019 पर्यंत पतीने आपल्याला शरीरसंबंधापासून वंचित ठेवले. लग्नाच्या वेळी फिर्यादी तरुणीला खोटे बोलून विविध आश्‍वासने दिली होती. ती पूर्ण न करता फसवणूक केली.

लग्नासाठी फिर्यादी यांच्या आई-वडिलांनी 20 लाख रुपये खर्च केला असूनही त्यांच्याकडून आणखी दहा लाख रुपये आणावेत, यासाठी वेळोवेळी शिवीगाळ आणि मारहाण करीत शाररीक व मानसिक छळ करण्यात आला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.