Chikhali : जाधववाडी, बो-हाडेवाडीत ‘टीपी स्कीम’ला महापौरांचा विरोध

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने समाविष्ट गावातील 12 भागांत टाऊन प्लॅनिंग (टीपी) स्कीमनुसार विकास करण्याचे नियोजित आहे. मात्र, प्रभाग क्रमांक दोन मधील बो-हाडेवाडी, जाधववाडी, चिखलीत ‘टीपी स्कीम’ राबविण्यास महापौर राहुल जाधव यांनी विरोध दर्शविला आहे. तसेच हा भाग ‘टीपी स्कीम’मधून वगळण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘टीपी स्कीम’चा प्रथमच स्वीकार केला आहे. या अंतर्गत शहरातील थेरगाव, चिखली, चिंचवड, चर्‍होली, रावेत, किवळे, पुनावळे, ताथवडे, मामुर्डी, डुडुळगाव, मोशी, बोर्‍हाडेवाडी या 12 भागांचा विकास केला जाणार आहे.

बो-हाडेवाडी, जाधववाडी, चिखली या गावांच्या ‘टीपी स्कीम’ला महापौर जाधव यांनी विरोध दर्शविला आहे. विकास योजना प्रस्तांवाची अंमलबजावणी करणे हा नगररचना योजना तयार करण्याचा मुख्य उद्देश असतो. प्रभाग क्रमांक दोन मधील बो-हाडेवाडी, जाधववाडी, चिखली या गावातील सर्व नागरिक, शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापौर जाधव यांची भेट घेऊन प्रस्तावित ‘टीपी स्कीम’ला तीव्र विरोध दर्शविला आहे.

बो-हाडेवाडी, जाधववाडी, चिखली भागातील सर्व गट क्रमांकामधील शेतक-यांचा ‘टीपी स्कीम’ राबविण्यास असलेला विरोध लक्षात घेऊन हा भाग ‘टीपी स्कीम’मधून वगळण्यात यावा. स्थानिक शेतक-यांना विश्वासात घेऊनच ‘टीपी स्कीम’ राबविण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव यांनी प्रशासनास दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.