Chikhali : निलेश नेवाळे यांच्या वतीने आयोजित नोकरी महोत्सवात ‘ऑन द स्पॉट’ 355 जणांना नोकरी

एमपीसी न्यूज – सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांच्या (Chikhali)वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य नोकरी महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळाला. यामध्ये 534 जणांनी सहभाग घेतला. त्यातील 355 जणांना ‘ऑन द स्पॉट’ नोकरी देण्यात आली. तर, 123 जणांना दुस-या राऊंडमध्ये मुलाखतीसाठी बोलविण्यात आले आहे.

सामाजिक उपक्रमांनी निलेश नेवाळे यांचा वाढदिवस साजरा केला. घरकुल हॉस्पिटल येथे व्हील चेअर, बाकडे भेट देण्यात आले. मिठाईचे वाटप करण्यात आले. बेरोजगार तरुणांसाठी रविवारी (29) भव्य नोकरी महोत्सव घेण्यात आला. पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), हिंजवडी माहिती व तंत्रज्ञाननगरी (आयटी पार्क) मधील कंपन्यांसह बीव्हीजी कंपनी सहभागी झाली होती. या नोकरी महोत्सवात 534 जणांनी सहभाग घेतला. त्यातील 355 जणांना ‘ऑद न स्पॉट’ नोकरी देण्यात आली. तर, 123 जणांना दुस-या राऊंडमध्ये मुलाखतीसाठी बोलविण्यात आले आहे. 355 जणांना जागेवर नोकरी मिळाली. याचे समाधान आहे. उर्वरित 123 जणांनाही लवकरच नोकरी मिळेल असा विश्वास नेवाळे यांनी व्यक्त केला.

मान्यवरांकडून नेवाळे यांचे अभिष्टचिंतन

सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. नेवाळे यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. समाजासाठी सातत्याने करीत असलेल्या कामाचे कौतुक केले.  भोसरीचे आमदार महेश लांडगे, कार्तिक लांडगे, माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, माजी नगरसेवक सुरेश तात्या म्हेत्रे, अंकुश मळेकर, किसन बावकर, दिनेश यादव, संतोष मोरे, विश्वास गजरामाल, कवितके दादा, घरकुल फेडरेशनचे अध्यक्ष सुधाकर धुरी, दत्तात्रय गव्हाणे, नविन बग, सुजित पाटील, गणेश पिंजण, माजी नगरसेविका योगिता नागरगोजे, सारिका पवार, नवनाथ जगताप, संदीप रासकर यांनी नेवाळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share