Chikhali: चिखली-कृष्णानगर येथे कबड्डी प्रशिक्षण केंद्र सुरू करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे कबड्डी खेळाडू तयार होण्यासाठी भोसरीत कबड्डी प्रशिक्षण केंद्राचे काम सुरू केले आहे. त्यानंतर आता महापालिकेमार्फत आंतरराष्ट्रीय कबड्डीपट्टू प्रवीण नेवाळे यांच्यात संयुक्तपणे चिखली- कृष्णानगर येथेही कबड्डी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सर्वसाधारण सभेत उपसूचनेद्वारे त्याला मान्यता दिली.

कबड्डी खेळामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविला आहे. तसेच शहराचे नावही क्रीडा क्षेत्रात उंचावले आहे. भोसरीतील भैरवनाथ कबड्डी संघ, चिखलीतील ब्रह्मा-विष्णू-महेश कबड्डी संघ असे अनेक नावाजलेले कबड्डी संघ शहरात आहेत.

  • महापालिकेमार्फत भोसरीतील गावजत्रा मैदानालगत खेळाचे मैदान विकसित करण्यात येत आहे. या मैदानालगत आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. कुस्ती केंद्राबरोबरच या मैदानात कबड्डी प्रशिक्षण केंद्रही विकसित करण्यात येत आहे. या कबड्डी प्रशिक्षण केंद्रासाठी 8 कोटी 86 लाख रुपये खर्च होणार आहे.

भोसरीत कबड्डी प्रशिक्षण केंद्र होत असतानाच आता महापालिकेमार्फत चिखलीतील आंतरराष्ट्रीय कबड्डीपट्टू प्रवीण नेवाळे यांच्यात संयुक्तपणे कबड्डी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याला महासभेत उपसूचनेद्वारे मंजुरी देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.