Chikhali : किरकोळ कारणावरून चार जणांवर चाकूने वार; तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पॅसेजमध्ये पाय पसरून बसणाऱ्यास पाय बाजूला घेण्यास सांगितले. या किरकोळ कारणावरून एका तरुणाने चार जणांवर चाकूने वार केले. ही घटना शुक्रवारी (दि. 28) सायंकाळी सहा वाजता घरकुल चिखली येथे घडली.

राजेंद्र बारकू पाटील (वय 42, रा. घरकुल चिखली), सरस्वती पाटील, सागर पाटील, साहिल पाटील अशी जखमींची नावे आहेत. राजेंद्र पाटील यांनी शनिवारी (दि. 29) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी गणेश बाबुराव अडागळे (वय २६, रा. घरकुल चिखली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी घरकुल येथे एकाच इमारतीमध्ये शेजारी शेजारी राहतात. शुक्रवारी सायंकाळी आरोपी इमारतीच्या सातव्या मजल्यावरील पॅसेजमध्ये पाय पसरवून बसला होता. त्यावेळी फिर्यादी तिथून जात होते. त्यांनी आरोपीला पाय बाजूला घेण्यास सांगितले. त्यावरून आरोपीने घरातून चाकू आणला आणि राजेंद्र यांच्या डोक्यात वार केले. भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नी सरस्वती, दोन मुले यांच्यावर देखील चाकूने वार करून जखमी केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.