Chikhali: घरकुलमध्ये आयसोलेशन वॉर्ड करण्यास स्थानिकांचा विरोध

Chikhali: Locals oppose isolation ward in Gharkul घरकुलमधील नागरिकांनी आयसोलेशन वॉर्ड करण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. आज नागरिकांनी बाहेर येत काम बंद पाडले होते.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिखलीतील घरकुलमधील इमारतींमध्ये आयसोलेशन वॉर्ड करण्यास आणि तिथे बाधित नागरिकांना ठेवण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. नागरिकांना बाहेर येत काम बंद पाडले आहे.

शहरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढत होत असल्याने महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. रुग्णांना, त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सदस्यांना क्वारंटाईन करण्याकरिता जागा अपुरी पडू नये. त्यासाठी चिखली येथील घरकुल प्रकल्पातील डी-5, डी-6, डी-8 आणि डी 7 या चार इमारतींमध्ये कोरोना रुग्णांसाठी आयसोलेशन वॉर्ड केला जाणार आहे.

एका इमारतीत 42 सदनिका आहेत. अशा एकूण 168 सदनिका चार इमारतींमध्ये आहेत. त्यादृष्टीने काम सुरु आहे. या इमारतींमध्ये 336 फॅन, 168 वॉटर गिझर, 1160 बल्ब आदी सुविधा पुरविण्यात येणार आहे. महापालिकेकडून जोरदार तयारी सुरु आहे.

परंतु, घरकुलमधील नागरिकांनी आयसोलेशन वॉर्ड करण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. आज नागरिकांनी बाहेर येत काम बंद पाडले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.