Chikhali Lockdown News : कुदळवाडी येथे कष्टकऱ्यांसाठी अल्पदरात भोजन सेवा

एमपीसीन्यूज : लॉकडाउनमुळे रोजगार बुडालेल्या कष्टकरी आणि गोरगरीब नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी पिंपरी चिंचवड कामगार संघटनेच्यावतीने चिखली- कुदळवाडी येथे अल्पदरात भोजन सेवा सुरु करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक -अध्यक्ष युवराज पवार यांच्या वतीने  आजपासून ( मंगळवारी) या सेवेचा प्रारंभ करण्यात आला.

कुदळवाडी येथील मोरे पाटील चौक येथे अल्पदरात भोजन सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कष्टकऱ्यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला.

या वेळी आमदार महेश लांडगे, नरहरी बालघरे, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, पोलीस कर्मचारी शंकर यमगार, वैभव छाजेड, उद्योजक राहूल यादव, सचिन मोरे, किशोर बालघरे, अक्षय भोसले, संतोष कुंभार, सुदाम पवार, राम बोरखडे, मुन्ना चौधरी, काका म्हेत्रे, योगेश पवार, शुभम पवार, दत्ता यादव, आकाश किवळे, ओंकार पवार, सुनिल मारणे, कृष्णा पवार, हरिष चौधरी आदी उपस्थित होते.

या ठिकाण सकाळी अकरा ते रात्री अकरा वाजेपर्यंत जेवण उपलब्ध होणार आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या कष्टकरी वर्गाची आर्थिक परिस्थिती दयनीय झाली आहे. त्यांच्यासाठी केवळ 15 रुपयांत  शाकाहारी जेवण उपलब्ध करून देण्यात आले आहे. लॉकडाऊननंतरही परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत ही सुविधा सुरु राहणार असल्याची माहिती युवराज पवार यांनी दिली.

दरम्यान, स्थानिक उद्योजक विशाल बालघरे यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रमही कष्टकऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.