Chikhali : गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास अटक; गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून सुमारे 18 हजार रुपये किमतीचा 800 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी (दि. 14) चिखली येथे ही कारवाई केली.

जगन्नाथ लक्ष्मण धोत्रे (वय 48, रा. कुदळवाडी, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार राजेंद्र देवराम बांबळे (वय 41) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धोत्रे हा हरगुडेवस्ती, चिखली येथे गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून धोत्रे यास ताब्यात घेतले. पोलिसांनी धोत्रे याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सुमारे 18 हजार रुपये किमतीचा 800 ग्राम गांजा मिळून आला. पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.