Chikhali: बेकायदेशीरपणे गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एकाला अटक

Chikhali: Man arrested for transporting gutkha illegally

एमपीसी न्यूज- बेकायदेशीरपणे प्रतिबंधित गुटखा कारमधून घेऊन जाताना एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक कार आणि गुटखा असा एकूण 1 लाख 74 हजार 900 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

खरताराम मोहनलाल चैधरी (वय 38, रा. मोरेवस्ती, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी सोपान हरिदास इंगळे (वय 33) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई सोमवारी (दि.1) रात्री नऊ वाजता विकास अनाथ आश्रम समोर सोनवणे वस्ती, चिखली येथे करण्यात आली आहे. आरोपी चौधरी हा कारमधून (एमएच 12 एचएल 2842) सोमवारी रात्री प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी घेऊन जात होता.

याबाबत पोलिसांना माहीती मिळाली. अन्न व औषध प्रशासन विभाग आणि चिखली पोलिसांनी आरोपीला कारसह ताब्यात घेतले. कारची झडती घेतली असता कारमध्ये गोवा 1000 गुटख्याचे 24 हजार 900 रुपये किमतीचे 249 पॅकेट आढळून आले.

पोलिसांनी सर्व गुटखा आणि कार असा एकूण 1 लाख 74 हजार 900 रुपयांचा माल जप्त केला. गुन्हा दाखल करत चौधरी याला अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.